Gautami Patil: गौतमीला नाही म्हणून कसं चालेल?

सकाळ डिजिटल टीम

राज्यभरात सध्या राजकीय बातम्यांची चर्चा असली तरी त्यात गौतमीनं मात्र सगळ्यांना मागे टाकलं आहे.

सोशल मीडियावर गौतमीच्या नावाची चर्चा रंगली आहे. कोण आहे गौतमी असा ट्रेंडही सुरु झाला आहे.

तरुणाईला तर गौतमीविषयी नव्यानं सांगण्याची काही गरज नाही. तिचा कार्यक्रम ज्याठिकाणी असेल तिथं तिचे चाहते पोहचलेले असतात.

काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये झालेल्या एका लावणीच्या कार्यक्रमानं गौतमीचे नाव पुन्हा चर्चेत आले होते.

त्या कार्यक्रमाला लावणी प्रेमींनी एवढी गर्दी केली होती की, जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठे नुकसान झाले होते.

यासगळ्याबाबत गौतमीला पत्रकार परिषद घेऊन वेगळाच खुलासा करावा लागला होता.

गौतमीनं आपली वाटचाल अतिशय खडतर परिस्थितीतून झाली असून आपल्याविषयी अफवाच मोठ्या प्रमाणावर पसरवत असल्याचे म्हटले होते.

लोकं काहीही बोलली तरी त्यानं काही फरक पडत नाही. आपण त्यांचे मनोरंजन करत राहायचे अशी भूमिका गौतमीनं घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil