Gold Silver Price : 450 रुपयांनी सोनं स्वस्त! खरेदीसाठी उत्तम दिवस

निकिता जंगले

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून येत होती. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.

Gold Silver Price | sakal

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,008 रुपये तर 24 कॅरेट साठी 62,410 रुपये आहे.

Gold Silver Price | sakal

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 450 रुपयांची घट दिसून आली.

Gold Silver Price | sakal

चांदीच्या दरात किलोमागे 800 रुपयांची घट झाली आहे.

Gold Silver Price | sakal

24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाल्यानंतर इतर कॅरेटमध्येही बदल दिसून येत आहेत. अशा स्थितीत सराफा बाजारातील सोन्याच्या इतर कॅरेटच्या किंमतीमध्ये ही घट झाली आहे.

Gold Silver Price | sakal

22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,008 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा दर 45,824 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 35,641 रुपये आहे.

Gold Silver Price | sakal

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओद्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

Gold Silver Price | sakal

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

Gold Silver Price | sakal

सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असणे आवश्यक आहे.

Gold Silver Price | sakal

भारतीय मानक ब्युरोने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशनशिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Gold Silver Price | sakal

जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर वरील सर्व बाबींविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price | sakal