लवकर करा 'हे' काम, अन्यथा जीमेल अकाउंट होईल बंद!

सकाळ डिजिटल टीम

गुगलचा मोठा निर्णय

गुगलने आपली हजारो जीमेल खाती बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये अधिक काळापासून बंद असलेल्या जीमेल अकाउंट्सचा समावेश आहे.

Gmail | Esakal

कोणत्या अकाउंटना धोका?

गुगल सध्या दोन वर्षांपासून इनअ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या अकाउंट्सना डिलीट करणार आहे. दोन वर्षांपर्यंत जर त्या अकाउंटने साईन-इन केले नाही, तर त्या खात्यातील डेटा आणि खाते दोन्ही डिलीट केले जाईल.

Gmail | Esakal

इतर डेटाही जाणार

दोन वर्षांपासून बंद असलेले केवळ खातेच नाही, तर त्यामध्ये असलेले कॉन्टॅक्ट, ड्राईव्ह आणि फोटोजमधील डेटाही डिलीट होईल. स्टोरेज स्पेस वाचवण्यासाठी गुगलने हा निर्णय घेतला आहे.

Gmail | Esakal

यूट्यूबर्सना सवलत

सध्या गुगलने यूट्यूबर्सना यातून सवलत दिली आहे. ज्या अकाउंटवरून यूट्यूब व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत, त्यांना डिलीट करण्यात येणार नाही.

Gmail | Esakal

आणखी कोणाला सवलत?

गुगलची ही कुऱ्हाड केवळ फ्री अकाउंट्सवर पडणार आहे. बिझनेस किंवा स्कूल अकाउंट्सना या कारवाईचा कोणताही धोका नसेल.

Gmail | Esakal

गुगलने बदलली पॉलिसी

यापूर्वी गुगलने बंद खात्यांमधील डेटा डिलीट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कंपनीने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. यानंतर आता गुगलने इनअ‍ॅक्टिव्ह अकाउंट्सना थेट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gmail | Esakal

कंपनी देणार वॉर्निंग

कारवाई सुरू करण्यापूर्वी गुगल संबंधित यूझर्सना नोटिफिकेशन पाठवणार आहे. जेणेकरून ते वेळीच लॉग-इन करून आपले खाते वाचवू शकतील.

Gmail | Esakal

कधीपासून होणार कारवाई?

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२३ पासून गुगल ही कारवाई सुरू करेल. त्यानंतर दोन वर्षांपासून इनअ‍ॅक्टिव्ह खाती थेट बंद केली जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gmail | Esakal