Google Translate: चीनमध्ये 'गुगल ट्रान्सलेट' बंद

सकाळ डिजिटल टीम

चीनमध्ये आता गुगलची महत्वाची आणि सर्वाधिक लोकप्रिय असणारी गुगल ट्रान्सलेट ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.

हाँगकाँगमधून प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तामध्ये चीननं आता ही सुविधा बंद करण्यात आल्याचे सांगितले आहे.

गुगलकडून चीनमध्ये ही सुविधा बंद करण्यात आल्यानं अनेकांनी काळजी व्यक्त करण्यात आली आहे.

गुगलकडून बंद करण्यात आलेल्या सुविधांपैकी ही एक महत्वाची सुविधा असल्याचे सांगण्यात येत आहे.

वास्तविक चीनमध्ये पश्चिमी देशांकडून सोशल मीडिया कंपनीकडून ज्या सेवा दिल्या जातात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

चीनमध्ये गुगल ट्रान्सलेटसाठी मोबाईलवर एक अॅप आणि पीसीवर सर्च बार आणि लिंक दिसून येते.

मात्र हे वेबपेजच चीनमध्ये प्रतिबंधित करण्यात आले आहे. चीनमधील अनेक युझर्सनं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ही सुविधा चीनमध्ये बंद केली जाणार असे सांगण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.