धनश्री भावसार-बगाडे
म्हातारं होणं कोणालाच नाही आवडत आणि म्हातारपणाचं एक लक्षण म्हणजे केस पांढरे होणे.
बऱ्याच लोकांचे केस विशीत, तिशीतच पांढरे होऊ लागतात.
सुरुवातीला एखाद दुसराच केस पांढरा असतो पण धोक्याची घंटा समजून लोक अस्वस्थ होतात.
तो एखादाच असला तरी उपटून टाकण्याचा मोह अनेकांना होतो.
असं म्हणतात की, एक केस जरी उपटला तरी वेगात इतर केसपण पांढरे होतात. हे सत्य आहे की मिथक, जाणून घेऊया.
जेव्हा केसाच्या फॉसिल्समधलं मेलॅनीन कमी होऊ लागतं तेव्हा केस पांढरे होतात.
रंगद्रव्याच्या उत्पादनातील ही घट आनुवंशिकता, वय आणि पर्यावरणीय घटकांसारख्या घटकांमुळे प्रभावित होऊ शकते.
प्रत्येक केसाचा फॉसिल्स वेगवेगळा असल्याने एक पांढरा केस तोडल्याने इतर केस पांढरे होतात हे मिथक आहे.
प्रत्येक हेअर फॉसिल्स फक्त एकच केस निर्माण करतो. एक केस उपटल्याने इतर फॉसिल्सवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.
एक पांढरा केस उपटल्याने इतर केसही पांढरे होतात हा दावा खोटा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.