HBD Amitabh Bachchan : ऐश्वर्या सासऱ्यांना फॉलो करत नाही

सकाळ डिजिटल टीम

बच्चन फॅमिलीत सगळेच बच्चन आहेत. बिग बी, जया बच्चन, सून ऐश्वर्या, मुलगा अभिषेक एवढेच नाही तर नात आराध्याचंही फॅन फॉलोविंग भरपूर आहे.

शेहंशाहने तरूणपणात कमवलेला चाहता वर्ग आजही कमी झालेला नाही. तर ऐश्वर्या राय-बच्चन मिस वर्ल्ड होण्याआधीपासूनच तिचा चाहता वर्ग मोठा होता.

सासरे अमिताभ बच्चन आणि सून ऐश्वर्या यांच्यातले बाँडिंग फार चांगले असल्याच्या चर्चा कायमच रंगतात.

ॲवॉर्ड फंक्शन असो किंवा कोणताही कार्यक्रम सून आणि सासऱ्यांमधलं हे बाँडिंग अनेकदा कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

बऱ्याचदा त्याविषयी उलट, सुलट चर्चा सुध्दा रंगत असते.

पण या सर्वाचा त्यांच्या नात्यावर किंवा कुटुंबावर काहीही परिणाम न झाल्याचं त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे.

एवढ सगळं असलं तरी ऐश्वर्या तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून सासरे अमिताभ बच्चन यांना फॉलो करत नाही. ती पती अभिषेक बच्चन सोडून इतर कोणालाही फॉलो करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.