भारताची स्टार कर्णधार हरमन आहे करोडो रूपयांची मालकीण

अनिरुद्ध संकपाळ

भारताची स्टार कर्णधार हरमनप्रीत कौर जेव्हापासून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार झाली आहे. तेव्हापासून भारतीय संघ एका वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे.

Harmanpreet Kaur

हरमनप्रीत कौर वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करते. त्यांनी पहिलाच हंगाम जिंकला होता.

Harmanpreet Kaur

हरमनप्रीत कौर क्रिकेटच्या मैदानावर अग्रेसर तर असतेच मात्र ती कमाईच्या बाबतीत देखील आघाडीवरी आहे.

Harmanpreet Kaur

बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील महत्वाची खेळाडू असलेल्या हरमनप्रीत कौरची एकूण संपत्ती ही 25 कोटी रूपये आहे.

Harmanpreet Kaur

तिला केंद्रीय कराराअंतर्गत बीसीसीआयकडून वर्षाला 50 लाख रूपये पगार मिळतो. याचबरोबर तिला एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख आणि टी 20 साठी 3 लाख रूपये मिळतात.

Harmanpreet Kaur

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सकडून 1.80 कोटी रूपये मिळतात. हरमन बीग बॅश लीग, वुमन्स टी 20 चॅलेंज, दहंड्रेड अशा लीग देखील खेळत असते. त्यातूनही हरमन लाखो रूपये कमवते.

Harmanpreet Kaur

याचसोबत अनेक जागतिक ब्रँड्सची जाहिरात केल्यानंतर देखील हरमनला कोट्यावधी रूपये मिळतात. ती सध्या बूस्ट, एचडीएफसी लाईफ, सीएट, नाईकी, प्यूमा, फँटसी लीग यांच्या जाहिराती देखील करते.

Harmanpreet Kaur

हरमनप्रीतचे मुंबईजवळ आणि पटियालामध्ये आलीशान घर आहे. तिच्या घराच्या किंमतीबाबत अजून खुलासा झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur