नारळाची चटणी आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा कमालीचे फायदे

साक्षी राऊत

नारळाची चटणी

नारळाची चटणी दाक्षिणात्य पदार्थांमधील महत्वाचा पदार्थ आहे. चवीला टेस्टी असण्याबरोबरच आरोग्यासाठीसुद्धा ही फार फायदेशीर ठरते. चला तर या चटणीच्या काही फायद्यांबाबत जाणून घेऊया.

Coconut Chutney Health Benefits

न्यूट्रिशन व्हॅल्यू

नारळाच्या चटणीमध्ये २ ग्रॅम फॅट असते. यात जवळपास ४०-५० कॅलरीज, २ ग्रॅम कार्ब्स, प्रोटीन आणि सोडियम यांसारखे पोषक तत्व असतात.

Coconut Chutney Health Benefits

वजन

नारळाची चटणी खाऊन तुम्ही वजनदेखील कमी करू शकता. यात कॅलरीजची मात्र कमी असते. तेव्हा लोणचे किंवा अन्य पदार्थांचे सेवन करण्याऐवजी नारळाची चटणी खा.

Coconut Chutney Health Benefits

रक्तपातळी

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास नारळाची चटणी खाणे फायदेशीर ठरते. नारळाची चटणी खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता भरून निघते.

Coconut Chutney Health Benefits

इम्युनिटी

नारळाची चटणी खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. यात व्हिटॅमिन, खनिजे, कार्ब्स यांचे प्रमाण जास्त असते. हृदयविकाराच्या रूग्णांसाठी ही चटणी फायद्याची असते.

Coconut Chutney Health Benefits

पचनशक्ती

नारळाची चटणी पचनशक्तीसाठी फायदेशीर आहे. यात फायबर भरपूर प्रमाणात असते. या चटणीचे सेवन केल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या दूर होतात.

Coconut Chutney Health Benefits

बीपी कंट्रोल

नारळाच्या चटणीचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. या चटणीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. या चटणीचे सेवन केल्याने इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coconut Chutney Health Benefits