रोज रात्री आईस्क्रीम खाऊन 25 किलो वजन कमी केलं, फिटनेस कोचचं वेट लॉस डायट बघा

Aishwarya Musale

वजन कमी

एक ट्रॅव्हल एजंट 25 किलो वजन कमी करून फिटनेस कोच बनली आहे. या फिटनेस कोचचे नाव ब्रिटनी मॅकक्रिस्टल असून ती न्यूझीलंडची असली तरी सिडनीमध्ये राहते.

brittany | sakal

डेस्क जॉब

28 वर्षीय ब्रिटनीने जेव्हा डेस्क जॉब करायला सुरुवात केली तेव्हा तिचे वजन 82 किलोपर्यंत पोहोचले होते.

brittany | sakal

ब्रिटनी

ब्रिटनीने काही काळामध्ये 25 किलो वजन कमी केले आणि आता तिचे वजन 57 किलो आहे.

brittany | sakal

हेल्दी फूड

ब्रिटनीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिने वजन कमी करताना मिठाई देखील खाल्ली कारण तिचा विश्वास आहे की हेल्दी फूड बेचव असणे आवश्यक नाही. तसेच ती रोज रात्री नॉन व्हेज नूडल्स आणि आईस्क्रीम खाते.

brittany | sakal

कॉफी

ब्रिटनी म्हणते की ती नेहमीच तिची सकाळ कॉफीने करते आणि नंतर उकडलेली अंडी मशरूम, पालक आणि चीज खाते. तसेच चीजकेकही खाते. ती दुपारी चिकन चोरिझो रॅप खाते, ज्यामुळे तिला खूप ऊर्जा मिळते.

brittany | sakal

स्ट्रिक्ट डाएटिंग

ब्रिटनी म्हणते, 'जर तुम्ही स्ट्रिक्ट डाएटिंग केले आणि गोष्टींवर बंदी घातली तर तुमचे वजन कमी होणार नाही कारण तुमचे लक्ष फक्त खाण्यावर असेल.'

brittany | sakal

कॅलरीज

जास्त खाण्याच्या आणि पिण्याच्या सवयीमुळे तिचे वजन वाढल्याचे ब्रिटनीचे म्हणणे आहे. तिने कॅलरीज मोजून खाणे सुरू केले आणि 9 महिन्यांत सुमारे 25 किलो वजन कमी केले.

brittany | sakal

वर्कआउट

ब्रिटनीने वर्कआउटही सुरू केले ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

brittany | sakal