आवळा 'या' लोकांसाठी आहे विषासमान! चुकूनही खाऊ नका

Aishwarya Musale

आवळा हे एक पौष्टिक फळ असून यात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात.

ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते.

परंतु आवळा हा आम्लयुक्त असून त्यात सोडियम, पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने काही लोकांच्या आरोग्यासाठी आवळा खाणे घातक ठरू शकते. कोणते आजार असलेल्या लोकांनी आवळा खाणे टाळायला हवे हे जाणून घेऊयात.

अ‍ॅसिडिटीचा त्रास

जर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आवळ्याचे सेवन मर्यादित ठेवावे. अन्यथा त्यांचा अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढू शकेल आणि त्याचा शरीरावर विपरीत परिणाम दिसून येईल.

किडनीच्या आजाराने ग्रस्त

किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी आवळा अजिबात खाऊ नये. कारण अशा रुग्णांनी आवळा खाल्ल्यास शरीरातील सोडियमची पातळी वाढू शकते आणि यामुळे किडनीच्या कार्यावर अधिक परिणाम होतो.

लो ब्लड शुगर

आवळा रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. जर तुम्ही ब्लड शुगरने त्रस्त असाल तर आवळा खाणे टाळा. याशिवाय जे लोक डायबिटीजवर औषधे घेतात त्यांनी देखील आवळा खाणे टाळावे.

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी आवळा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण आवळा खाल्ल्याने पोट खराब होऊन, गरोदर महिलांना डिहायड्रेशनसारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.

ज्या लोकांची सर्जरी होणार आहे

ज्या लोकांची शस्त्रक्रिया होणार आहे त्यांनी आवळा खाऊ नये. याचे सेवन केल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या किमान 2 आठवडे आधी आवळा खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात.

स्ट्रॉबेरी केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.