हिवाळ्यात गोड आंबट बोर खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

Aishwarya Musale

हिवाळ्याला सुरुवात झाली असून बाजारात आंबट, गोड बोरंही यायला लागली आहेत. खायला रुचकर आणि पाहताच क्षणी जिभेला पाणी आणणारी बोरं जीवनसत्वांचे भांडार असतात.

बोरं खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया बोरं खाण्याचे फायदे.

अपचन

बद्धकोष्ठता, अपचन, सूज येणे आणि गॅस यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

चांगली झोप येते

जर तुम्हाला झोप येत नसेल तर बोर खा, कारण त्यात फ्लेवोनोइड्स-सैपोनिन आणि पॉलीसेकोराइड्स आहेत. हे नैसर्गिकरित्या झोपेस प्रवृत्त करते.

हाडे मजबूत राहतात

बोराचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. त्यात बरेच गुणधर्म आहेत, तसेच यामध्ये भरपूर कॅल्शियम आढळते.

डोळे दुखणे

बोर खाल्ल्याने तुमचे डोळे दुखणे दूर होऊ शकते. सध्या बरेच लोक कॉम्पुटरवर काम करतात, यामुळे आपल्या डोळ्यांत जळजळ आणि वेदना यासारख्या समस्या उद्भवतात.

याशिवाय आपण बोराची साल बारीक करून डोळ्याभोवती लावू शकता.

लिव्हर संबंधीत समस्या

अँटी-ऑक्सीडेंट्समुळे लिव्हर संबंधीत समस्या दूर होते, तसेच त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी देखील बोरं खाणे फायदेशीर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.