थंडीत वारंवार कोरडे होतात डोळे? या पद्धतींनी घ्या डोळ्यांची काळजी

Aishwarya Musale

थंड हवामान

थंड हवामानात डोळे कोरडे पडतात. हवेतील प्रदूषण आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच थंड हवामानात हवा कोरडी असल्याने ही समस्या उद्भवू शकते.

ड्राय आय सिंड्रोम

या समस्येला ड्राय आय सिंड्रोम म्हणतात. हे टाळण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.

कोरडेपणा

धुक्याच्या परिस्थितीत डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे. कारण धुक्यातील धूळ डोळ्यांना त्रास देते आणि कोरडेपणा निर्माण करते.

अश्रू

डोळ्यात अश्रू न येणे किंवा लवकर कोरडे पडणे यामुळे ही समस्या उद्भवते. या कारणास्तव, डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे किंवा अस्पष्ट दृष्टी यासारख्या डोळ्यांच्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.

लक्षणे

डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यात चुरचुरणे, अस्पष्ट दृष्टी, प्रकाशाची समस्या, डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे ही ड्राय आय सिंड्रोमची लक्षणे आहेत.

डोळ्यांवर परिणाम

बराच वेळ फोन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघितल्याने डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

चष्म्याचा वापर करा

त्यामुळे बराच वेळ स्क्रीनकडे पहाणे टाळावे आणि डोळ्यांना विश्रांती द्या. बाहेर पडताना चष्म्याचा वापर करा.

तुम्हीही पोटावर झोपत असाल तर आताच बदला सवय, कारण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.