कारल्यासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पाच पदार्थ, अन्यथा...

Aishwarya Musale

आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की आरोग्यासाठी कारलं अत्यंत चांगलं असतं. तुम्हाला कारलं खाताना कडू लागत असेल पण याच्यात बरेच औषधी गुणधर्म उपलब्ध आहेत. तुम्ही जर दररोज कारलं खात असाल तर तुमच्यापासून अनेक आजार दूर राहतील.

दररोज सकाळी मधुमेही रूग्णांना कारल्याचं ताजं ज्यूस दिलं तर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. कारलं खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित आजारही दूर राहतात.

परंतु कारल्यासोबत काही पदार्थाचं सेवन करणं जीवावर बेतू शकतं. अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर आज आपण कारल्यासोबत कोणकोणते पदार्थ खाणं टाळायला हवं ते जाणून घेऊया.

दूध

तुम्ही जर जेवणात कारलं आणि दूध सोबत घेत असाल तर आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे पोट बिघडतं. तसेच बद्धकोष्टता आणि जळजळ होऊ शकते.

दही

आपल्यातील अनेकांना दही आणि ताक प्यायला आवडतं. पण कारल्याची भाजी खाल्यानंतर चुकूनही दही आणि ताक पिऊ नका. यामुळे त्वचेची समस्या निर्माण होऊन खाज सुटू शकते. म्हणून कारल्यासोबत दही आणि ताकाचं सेवन करू नये.

आंबा

आपल्या प्रत्येकाला आंबा खायला आवडतो. आंबा जितका गोड आणि चवदार आहे याच्या उलट कारलं अत्यंत कडू असतं. यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कारण हे पचायला खूप जड जातं. तसेच उल्टी, मळमळ, छातीत जळजळ आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतं.

भेंडी 

कारलं आणि भेंडीची भाजी कधीही सोबत खाऊ नका. यामुळे तुमच्या आरोग्याचं मोठ नुकसान होऊ शकतं. भेंडी आणि कारलं सोबत खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मुळा

कारलं आणि मुळा सोबत खाल्ल्याने पोटात गडबड होऊ शकते. ज्यांना आधीपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास आहे त्यांनी कारलं आणि मुळा एकत्र खाऊ नये. यामुळे कफची समस्या निर्माण होऊ शकते आणि अॅसिडिटीचाही त्रास होऊ शकतो.

दररोज सायकल चालवणं हृदयासाठी फायदेशीर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.