महिनाभर रोज सकाळी भिजवलेले मनुके खा, शरीराला होतील हे जबरदस्त फायदे

Aishwarya Musale

मनुका

आपल्या देशात सुरुवातीपासून लोकांना मनुका खायला आवडते. मग तो कोणताही सण असो वा इतर कोणताही शुभ प्रसंग. मनुका हा खीर-हलवा या डिशचा अत्यावश्यक भाग आहे.

कॅल्शियम

हे खाण्यास चविष्ट तर आहेच पण त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि आयर्न सारखे पोषक घटक देखील असतात.

आरोग्य

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही मनुके रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी सेवन केले तर शरीराला अनेक फायदे मिळतात.

हाडे मजबूत होतात

मनुक्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात. यासोबतच हाडांच्या दुखण्याची समस्याही दूर होते.

मजबूत प्रतिकारशक्ती

मनुकामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. जर तुम्ही दररोज भिजवलेले मनुके खाल्ले तर तुमचे शरीर आजारांपासून सुरक्षित राहते.

रक्त वाढते

मनुकामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने अॅनिमियापासून बचाव होतो.

पोट स्वच्छ राहते

ज्यांना बद्धकोष्ठता आणि गॅस-अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी रोज सकाळी भिजवलेले मनुके खावेत.

समस्या दूर होते

यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले फायबर पचन सुधारण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.