Aishwarya Musale
गरोदरपणाच्या काळात शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात, ज्यामुळे आपल्या शरीरासह मानसिक रित्याही काही बदल होतात. त्यामुळे या काळात खाण्यापासून ते रोजच्या दिनचर्येपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
गर्भधारणा झाल्यावर, काही पदार्थ खाणे, औषधे, अल्कोहोल, धूम्रपान यासारख्या गोष्टी टाळणे चांगले मानले जाते. आजकाल केसांना कलर करणं खूप ट्रेंडमध्ये आहे. अशा परिस्थितीत गरोदर असताना केसांना कलर करावा की नाही, असा प्रश्न अनेकींना पडतो.
हेअर कलरमध्ये अनेक रसायने असतात, त्यामुळे गरोदरपणात त्यांचा वापर करावा की नाही ते जाणून घेणे महत्वाचे ठरते. याबाबत एक अभ्यास काय सांगतो, ते जाणून घेऊया.
याबाबत डॉक्टर सांगतात की, गरोदरपणात केसांना रंग लावणे सुरक्षित आहे की नाही याबद्दल फारशी माहिती नाही. परंतु हेअर डाईमध्ये असलेल्या रसायनांचा कमीत कमी, थोडा भाग तरी(किमान) तुमच्या स्कॅल्पद्वारे तुमच्या शरीरात शोषला जातो.
गरोदर असताना केस रंगवणे सुरक्षित आहे की नाही यावर फारसे संशोधन झालेले नाही. कारण गर्भधारणेदरम्यान कोणत्याही महिलेवर क्लिनिकल चाचण्या करता येऊ शकत नाहीत. गर्भधारणेदरम्यान केस कलर करायचेच असतील, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
गरोदरपणात पहिले तीन महिने अतिशय महत्वाचे आणि नाजूक असतात. हा काळ गर्भातील गर्भाच्या वाढीचा आणि विकासाचा असतो. मेंदू आणि पाठीचा कणा यासारखे महत्त्वाचे अवयव पहिल्या तिमाहीत तयार होत आहेत. या काळात नीट काळजी घेणे आणि सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुम्ही गरोदरपणात केसांना कलर करायचा विचार करत असाल तर हर्बल कलर वापरण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही चांगल्या हेअर स्टायलिस्टचा सल्लाही घेऊ शकता.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तात्पुरत्या काळासाठी आणि कायमस्वरूपी असणाऱ्या हेअर कलरमध्ये अधिक प्रमाणात रसायने असतात, त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे गरोदरपणात हेअर कलर करायचा असेल तर टेम्पररी कलर करणे उत्तम ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.