हिवाळ्यात मका खाणे का फायदेशीर? जाणून घ्या त्यामागचे कारण

Aishwarya Musale

मका, ज्याला जगभरात कॉर्न म्हणून ओळखले जाते, हे एक अतिशय आरोग्यदायी धान्य आहे. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.

हे डोळे आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. मका हे एक असे धान्य आहे जे जगभरात खूप लोकप्रिय आहे. तसेच, त्याच्या अनेक जाती जगभरात उगवल्या जातात.

हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या मका खाल्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात. मका पचनसंस्थेसाठी उत्तम मानला जातो. तसेच पोटाशी संबंधी समस्यांवर देखील मका गुणकारी आहे.

कॉर्न हे अँटिऑक्सिडंट्सचे स्त्रोत आहे, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुम्हाला ब्लड शुगरचा त्रास होत असेल तर तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात.

रोज मका खाल्ल्याने मधुमेह किंवा रक्तातील ग्लुकोज कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर मक्याचे सेवन केल्याने थंडीच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळतो.

मका हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

तसेच व्हिटॅमिन सी हे तुमच्या शरीरातील संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि फुफ्फुसांना बरे करण्यास मदत करते.

ज्या व्यक्तींना मधुमेह, कॅन्सर यां सारख्या समस्या आहेत त्यांनी मक्याचे सेवन करावे. तसेच थंडीच्या दिवसात देखील तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.