Aishwarya Musale
जर तुम्हाला मासे खायला आवडत असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
मासे खाणे आरोग्यासाठी चांगले असले तरी काही पदार्थांबरोबर ते खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊन पचनाचे आजार होऊ शकतात.
दुधाबरोबर मासे खाल्ल्याने पचनाच्या समस्या, पोटदुखी आणि ऍलर्जी होऊ शकते.
मासे आणि लिंबूवर्गीय फळांचे मिश्रण देखील धोकादायक असू शकते. लिंबूवर्गीय फळांमध्ये आम्ल असते.
माशांसह दह्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी ठरतं.
अनेक लोकांना माशांचे पदार्थ बनवताना दह्याचा वापर करण्याची सवय असते.
मासे खाल्ल्यानंतर त्वरीत तुम्ही आईस्क्रिमचे सेवन केल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. मासे हे पदार्थ उष्ण असते तर आईस्क्रिम हा पदार्थ पोटासाठी थंडावा आणणारा असतो. त्यामुळे तुम्ही मासे आणि आईस्क्रिम असे कॉम्बिनेशन खाल्ले तर अन्नपचन नीट होत नाही.
माशांच्या सेवनासह चहा आणि कॉफीचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. चहा आणि कॉफी बनविण्यासाठी दुधाचा वापर करण्यात येतो. मासे आणि दुधाचे मिश्रण हे पचनासाठी अतिशय त्रासदायक ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.