Aishwarya Musale
फळे आणि भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले गुणधर्म पचन, त्वचा, हृदय आणि इतर अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे आहारात यांचा समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.
विशेषत: हंगामी फळे आणि भाज्या तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात हंगामी भाज्या आणि फळे खाणे आवश्यक आहे.
द्राक्षे चवदार तर असतातच शिवाय आरोग्यदायीही असतात. तुमच्या रोजच्या आहारात याचा समावेश करून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता.
तज्ज्ञांच्या मते, आयुर्वेदात द्राक्ष हे सर्वोत्तम फळ मानले जाते. तज्ञ म्हणतात की तुम्ही गोड द्राक्षे खावीत कारण ते वात आणि पित्त दोष संतुलित करतात.
मायग्रेनची समस्या असलेल्या लोकांनी द्राक्षे खाल्ल्यास फायदा होतो. मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्षाचा रस खूप फायदेशीर मानला जातो.
हे डोळ्यांसाठी देखील खूप चांगले आहेत आणि शरीराचे पोषण करतात.
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 1, कॅल्शियम आढळते.
सुक्या द्राक्षांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो. ते स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.