कोमट पाण्यात अर्धा चमचा तूप टाकून प्यायल्यास आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

Aishwarya Musale

तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. दुसरीकडे तूप खाल्ल्याने वजन वाढते, असा काहींचा समज असल्याने ही मंडळी आहारातून तूप पूर्णपणेच वर्ज्य करतात.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व योग्य प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यायल्यासही आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. त्वचेपासून ते शरीराच्या पचनसंस्थेमध्येही सकारात्मक बदल पाहायला मिळतात. 

बद्धकोष्ठता

आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा अभाव असल्यानं अन्नाचे पचन योग्यरित्या होत नाही. परिणामी काही जण बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे त्रस्त असतात.

या समस्येपासून मुक्तता हवी असल्यास कोमट पाण्यामध्ये तूप मिक्स करून प्यावे. यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. 

त्वचा होते सुंदर

तुपामध्ये नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझरचे गुणधर्म असतात. यामुळे शरीर आतील बाजूने सुंदर होण्यास मदत मिळते.

कोमट पाण्यामध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराच्या आतील भागात असणाऱ्या आतड्या स्वच्छ होतात. शरीराच्या पचनसंस्थेचं कार्य सुरळीत सुरू राहतं, त्यावेळेस शरीरात विषारी घटक जमा होत नाहीत.

वजन नियंत्रणात राहते

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुपाचे सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स आणि विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या फेकले जातात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते.

एकाच ठिकाणी खूप वेळ उभे राहताय? या समस्यांचा करावा लागू शकतो सामना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.