ही पाने पाण्यात उकळून प्यायल्याने होतात असंख्य फायदे!

Aishwarya Musale

कढीपत्ता

भारतीय स्वयंपाकघरात तुम्हाला सर्व मसाले आणि पदार्थांसह कढीपत्ता नक्कीच मिळेल. त्याचबरोबर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्त्याशिवाय काहीच नाही, कढीपत्ता म्हणजे अविभाज्य घटक.

curry leaf | sakal

कार्बोहायड्रेट्स

मग तो डोसा असो, सांभर असो किंवा इडली. कढीपत्त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट, व्हिटॅमिन सी, कॅरोटीन, कॅल्शियम, लोह यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे याच्या सेवनाने शरीराला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

curry leaf | sakal

आरोग्य

पण तुम्हाला माहित आहे का कढीपत्ता पाण्यात उकळून प्यायल्यास आरोग्याला किती फायदे मिळू शकतात?

curry leaf | sakal

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर कढीपत्ता पाण्यात उकळून प्यायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या शरीराला शक्ती मिळते. खरं तर कढीपत्ता अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्माने समृद्ध असतो. याच्या सेवनाने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

curry leaf | sakal

जास्त वजन

जास्त वजनाचा त्रास असणारे लोक कढीपत्ता पाण्यात उकळून पिऊ शकतात. यामुळे वेगाने वजन कमी होते. आपण आपल्या जेवणात कढीपत्त्याचे सेवन देखील करू शकता. यात कॅलरीज खूप कमी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमच्या शरीरातील चरबी वाढत नाही.

curry leaf | sakal

पचनशक्ती

कढीपत्ता पाण्यात उकळून सकाळी प्या आणि पचनशक्ती मजबूत करण्यासाठी प्या. यामुळे तुमचे चयापचय वाढते.

curry leaf | sakal

पचनसंस्था

तसेच पचनसंस्थाही चांगली राहते. कढीपत्ता पाण्यात उकळून प्यायल्याने हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. कढीपत्त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने याच्या सेवनाने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.

curry leaf | sakal

रक्तातील साखरेची पातळी

ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळू शकता. इतकंच नाही तर याचा वापर केल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

curry leaf | sakal