नाचणीची पोळी खाण्याचे फायदे माहीत आहेत?

Harshada Shirsekar

निरोगी आरोग्य

आरोग्य निरोगी राहावे, अशी इच्छा असल्यास आहारामध्ये नाचणीच्या पोळीचा समावेश करा.

Ragi Roti Benefits | sakal

फायदे

नाचणीची पोळी खाण्याचे फायदे जाणून घेऊया सविस्तर 

Ragi Roti Benefits | sakal

पोषणतत्त्व

नाचणीचे पीठ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. यामध्ये पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. नाचणीच्या पिठामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, फायबर, कार्ब्स आणि व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असते.

Ragi Roti Benefits | sakal

वजन कमी होणे

नाचणीच्या पिठामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. परिणामी शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Ragi Roti Benefits | sakal

हाडे होतात मजबूत

सांधेदुखी किंवा हाडांच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेल्या लोकांनी आहारामध्ये नाचणीच्या पोळीचा समावेश करावा. कारण या पिठामध्ये कॅल्शिअमचे घटक असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

Ragi Roti Benefits | sakal

ऊर्जा

रोज सकाळी नाचणीची पोळी खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे दिवसभर थकवा जाणवणार नाही.

Ragi Roti Benefits | sakal

पचनप्रक्रिया

पचनसंस्था निरोगी राहावी, यासाठी आहारात नाचणीच्या पिठाचा समावेश करावा. कारण यामध्ये फायबरचे घटक असतात, ज्यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होते. 

Ragi Roti Benefits | sakal

मधुमेह

मधुमेहाची समस्या असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यासाठी नाचणीचे पीठ फायदेशीर असते. कारण यामुळे शरीरातील इंसुलिनची पातळी वाढण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे रक्तातील शर्करा देखील कमी होऊ शकते.

Ragi Roti Benefits | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ragi Roti Benefits | sakal