वारंवार भूक लागण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या

Aishwarya Musale

शरीराला ऊर्जा

आपण सर्वजण भूक लागल्यावर अन्न खातो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. साधारणपणे एखादी व्यक्ती दिवसातून तीन ते चार वेळा जेवते.

भूक

पण, जर तुम्हाला यापेक्षाही जास्त वेळा किंवा पोटभर जेवूनही वारंवार भूक लागत असेल तर मात्र वेळीच सावध व्हायला हवे.

आरोग्य

आरोग्य तज्ञांच्या मते, यामागे काही गंभीर कारणं असू शकतात. वारंवार भूक लागण्याची नेमकी कारणं कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  

प्रथिनांची कमतरता

अन्नामध्ये प्रोटीन कमी असल्यास अनेकदा भूक लागते. कारण प्रथिने ऊर्जा पुरवतात आणि भूक वाढवणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवतात. प्रथिने देखील अन्नाची लालसा कमी करण्याचे काम करतात.

झोपेची कमतरता

झोपेच्या कमतरतेमुळे सतत भूक लागते. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर भूकेचे संकेत देणारे घेरलिन हार्मोन अनियंत्रित राहते आणि वाढते. यामुळे सतत भूक लागते तसेच झोप घ्यावीशी वाटते.

रिफाईंड कार्ब्सच्या सेवनाने  

रिफाईंड कार्ब्सचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या अतिसेवनाने भूक वाढते आणि पटकन काहीतरी खावंसं वाटतं.

खूप ताण वाढल्यामुळे

आजची जीवनशैली धकाधकीची झाली आहे. जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे वारंवार भूक लागते. अशा परिस्थितीत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आजारांचा प्रभाव

मधुमेह आणि थायरॉईडसारख्या गंभीर आजारांमुळेही वारंवार भूक लागते.

लग्नाचे कपडे असे ठेवा जपून, अन् वापरा वर्षानुवर्ष!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.