काकडीचे सालीसकट सेवन करावे की करू नये? जाणून घ्या माहिती

Harshada Shirsekar

पोषणतत्त्वांचा साठा

उन्हाळ्यात काकडीचे सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि अन्य पोषणतत्त्वांचा समावेश असतो. 

cucumber benefits | sakal

हृदयासाठी पोषक

काकडीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम यासारखे पोषणतत्त्व असतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

cucumber benefits | sakal

कसे करावे सेवन?

पण काकडीचे सेवन सालीसकट करावे की करू नये, यावरून अनेकांचा गोंधळ उडतो. 

cucumber benefits | sakal

आरोग्यवर्धक फायदे

काही जण काकडी सोलून तर काही जण सालीसकट काकडीचे सेवन करतात.  व्यवस्थित स्वच्छ करून आपण काकडी सालीसकट खाऊ शकता. कारण काकडीच्या सालीमध्ये कित्येक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स असतात.

cucumber benefits | sakal

असे करतात संरक्षण

काकडीच्या सालीमध्ये फ्लेव्होनोइड्स आणि टॅनिन यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात.  

cucumber benefits | sakal

बद्धकोष्ठता

सालीसकट काकडी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.  

cucumber benefits | sakal

डिटॉक्स 

सालीसकट काकडी खाल्ल्यास शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत मिळू शकते. 

cucumber benefits | sakal

सावधगिरी बाळगा

सालीसकट काकडीचे सेवन करायचे असल्यास सर्वप्रथम आपण काकडी व्यवस्थितरित्या स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी आपण गरम पाण्याचाही वापर करू शकता.

cucumber benefits | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cucumber benefits | sakal