कर्करोगाला रोखण्यासाठी सकारात्मक जीवनशैली ठरेल फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

जागतिक कर्करोग दिन

कर्करोग हा शब्द जरी उच्चारला तरी मनात उभे राहते, ते मृत्यूचे चित्र. कर्करोगासारखा दुर्धर आजार झाला, की आपण स्वत:ला उपचारांसाठी डॉक्टरांकडे सोपवितो आणि स्वतःला हेल्पलेस (हतबल) समजतो.

world cancer day

आहार

कर्करोगग्रस्तांची वाढती संख्या ही जगापुढे मोठी समस्या आहे. मात्र, तुम्ही संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य उपचार घेतले तर तुम्ही यातून नक्कीच बरे होऊ शकता.

world cancer day

आहाराला औषध बनवा

संशोधनानुसार अन्नघटक हे शरीरावर दिवसातून तीन वेळा परिणाम करत असल्याचे आढळून आले आहे. काही अन्नघटक कर्करोग वाढीला, तर काही घटक कर्करोग पेशींना प्रतिबंध करतात. त्यामुळे कर्करोगविरोधी अन्नघटकांचा आहारात समावेश केल्यास त्याचा फायदा होतो.

world cancer day

जीवनशैली बदला

कर्करोग होण्यात चुकीची जीवनशैली हा महत्त्वाचा घटक असल्याचे संशोधनाद्वारे मांडण्यात आले आहे. जर तुम्ही शारीरिक कामे आणि आहार यात साधे आणि छोटे बदल जरी केले तरी कर्करोगापासून ४० टक्के बचाव करता येईल, असा जागतिक कर्करोग संशोधन परिषदेने निष्कर्ष मांडला आहे.

world cancer day

सकारात्मक विचार

अतिताण, सतत नैराश्यात राहणे, संतापाची भावना, दुःख, भीती, स्वत:चा तिरस्कार, स्वत:ला शिक्षा करणे, नकारात्मक विचारात राहणे, भावनांचा कोंडमारा करणे, आदी नकारात्मक बाबीही आजारांना शरीरात शिरकाव करण्यास साहाय्य करतात. त्यामुळे मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा.

world cancer day

ध्यान, योग, व्यायाम

सकारात्मक दृष्टिकोन, मनोबल, तसेच रोगप्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी ध्यान, योग, प्राणायाम, व्यायाम उपयुक्त ठरतो, व्यायामाद्वारे ४० टक्के कर्करोग नियंत्रणात राहतो, संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

world cancer day

कर्करोगावर उपचार करताना अथवा घेताना अनेक पाश्‍चात्त्य वैद्यकीय तज्ज्ञांनी ध्यान, योग, प्राणायामना आधार घेतला आहे.

world cancer day

हिवाळ्यात खायलाच हवा हरभरा, मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of hara chana | esakal