ॲसिडीटीमुळे छातीत होते जळजळ? या ड्रिंक्सने मिळेल आराम

Aishwarya Musale

ॲसिडीटी

अनियमितत जेवण, झोप यामुळे अनेकदा ॲसिडीटी, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवतात.

जर तुम्हालाही हा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही या ड्रिंक्सचे सेवन करू शकता. जे तुम्हाला त्वरित आराम देतील.

आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

चला तर मग जाणून घेऊया ॲसिडिटी आणि छातीत जळजळ यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती ड्रिंक्स कसे बनवावे.

कोमट पाणी

अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी, डॉक्टर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करण्याची शिफारस करतात. कोमट पाण्यात थोडी काळी मिरी आणि अर्धा लिंबू मिसळून प्यायल्याने गॅसची समस्या तर कमी होतेच पण वजन कमी होण्यासही मदत होते.

ओव्याचे पाणी

ओव्याचे पाणी पचन सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते. आपल्या दिनचर्येत त्याचा समावेश करण्यासाठी, फक्त एक ग्लास पाण्यात ओवा टाका आणि गरम करा. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास अॅसिडिटीपासून बऱ्यापैकी आराम मिळतो.

जिऱ्याचे पाणी

जिर्‍याचे पाणी प्यायल्याने जळजळ आणि अॅसिडिटीशी संबंधित समस्या कमी होतात. दिवसातून तीन वेळा जिऱ्याचे पाणी प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

बडीशेपचे पाणी

बडीशेप पाचक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्यात संयुगे असतात जे ऍसिड रिफ्लक्सची शक्यता कमी करण्यास मदत करतात.

आधी केलं इग्नोर.. नंतर जडलं प्रेम! अशी होती सानियाची लव्हस्टोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.