Mumbai Best : डबल डेअर बेस्टचा श्री गणेशा

सकाळ डिजिटल टीम

सध्या ८ डिसेंबरला बेस्टची पहिली डबलडेकर बस धावली होती. 

मुंबईच्या या बसचा जन्म लंडमध्ये झाला आहे. अशाच या लाल बस बद्दल आपण काही इंटरेस्टींग फॅक्ट्स जाणून घेऊया.

7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट कंपनी मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आणि बेस्ट उपक्रम बनली.

बेस्ट कंपनीने 15 जुलै 1926 रोजी 24 वाहनांच्या माफक ताफ्यासह आपली मोटरबस सेवा सुरू केली होती.

अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत पहिली बस धावली होती.

मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या बेस्टची सुरुवात रातोरात झालेली नाही. 1865 मध्ये, मुंबईत वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी एका अमेरिकन कंपनीनं घोड्याच्या सहाय्यानं ओढल्या जाणाऱ्या ट्राम सेवेच्या परवान्यासाठी अर्ज केला होता.

1947 मध्ये, बेस्ट महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कंपनी बनली आणि तिचं नाव बदलून बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाई आणि ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट करण्यात आलं.

1995 पर्यंत बॉम्बे बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन ही कंपनी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट म्हणून ओळखली जात होती.

पण जेव्हा 1995 मध्ये बॉम्बेचे नाव मुंबई करण्यात आलं तेव्हा या कंपनीचं नावही बदलून बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक असं ठेवलं गेलं तरीही ती बेस्ट म्हणून ओळखली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.