Face Bleach : चेहरा काळवंडलाय? घरीच करा १० रुपयांत नॅचरल ब्लीच

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या लग्न सराईत पार्लरला जायला वेळ नसेल तर तुम्ही घरच्या अगदी सहज ब्लीच करून ग्लो मिळवू शकतात.

Face Bleach | esakal

यासाठी आपल्याला अर्धा बटाटा, अर्धा टोमॅटो, अर्धे लिंबू, १ टेबलस्पून तांदळाचं पीठ, १ टेबलस्पून बेसनपीठ आणि चिमुटभर हळद एवढं साहित्य लागणार आहे.

Face Bleach | esakal

सगळ्यात आधी बटाट्याची साले काढून घ्या आणि त्याचे बारीक काप करून घ्या. त्याचप्रमाणे टोमॅटोही बारीक चिरून घ्या.

Face Bleach | esakal

आता मिक्सरच्या भांड्यात बटाट्याचे काप, टोमॅटोचे काप आणि अर्धे लिंबू सालासकट टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

Face Bleach | esakal

ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या. त्याचं जे पाणी निघेल त्यात तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाका.

Face Bleach | esakal

त्यातच थोडी हळद टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. हा पॅक चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा. त्यानंतर पॅक सुकू द्या.

Face Bleach | esakal

नंतर एका वाटीत कच्चे दूध घ्या. त्यात कापूस बुडवा आणि त्या कापसाने चेहरा चोळून चोळून स्वच्छ करा. 

Face Bleach | esakal

स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. अशा पद्धतीने आठवड्यातून दोन वेळा घरच्याघरी ब्लीच केल्याने चेहऱ्याचं टॅनिंग निघून जाईल व सुंदर ग्लो येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Bleach | esakal