DMart मध्ये एवढं स्वस्त सामान कसं मिळतं रे भाऊ?

Sandip Kapde

डिमार्ट

जर स्वस्त किराणा, कपडे किंवा भाजीपाला विकत घ्यायचा आहे तर एकच मॉल डोळ्यासमोर येतो तो म्हणजे डिमार्ट...

DMart Strategy

महिन्याचा किराणा भरायचा आहे म्हटल्यावर सर्व ग्राहक डीमार्टला पसंती देतात

DMart Strategy

DMart

इतर दुकानांपेक्षा डिमार्टमध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळते. चाहा पत्ती, बिस्कीट काही असो डिमार्टमध्ये सूट असतेच. बऱ्याच वस्तूंवर तर बाय वन गेट वन फ्रि ऑफर असते.

DMart Strategy

डीमार्ट

किराणा मालापासून ते प्रत्येक उत्पादनावर डीमार्ट एवढी सूट कशी देते असा प्रश्न लोकांना पडतो.

DMart Strategy

DMart

आज आम्ही या सगळ्यामागे असलेल्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. DMart च्या यशामागे 12वी पास व्यक्तीची शक्कल आहे.

DMart Strategy

राधाकृष्ण दमाणी

राधाकृष्ण दमाणी असं त्याचं नाव आहे. त्यांच शिक्षण कमी असलं तरी व्यावसायिक कौशल्य अप्रतिम आहे.

DMart Strategy

राधाकृष्ण दमाणी

राधाकृष्ण दमाणी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत आहेत.

DMart Strategy

५ हजार रुपयांच्या भांडवलात करोडोंची कंपनी स्थापन केली आहे.

DMart Strategy

डीमार्ट

राधाकृष्ण दमाणी यांनी २००२ मध्ये मुंबईत डीमार्टचे पहिले स्टोअर उघडले.

DMart Strategy

मॉलमध्ये किंवा भाड्याने कोणतेही दुकान उघडणार नाही, असे त्यांनी आधीच ठरवले होते. त्यांची ही रणनीती त्यांच्यासाठी लॉटरी ठरली.

DMart Strategy

राधाकृष्ण दमाणी

राधाकृष्ण दमाणी यांनी लोकांना वस्तूंवर सवलत द्यायला सुरुवात केली. त्यामुळे डीमार्ट काही वेळातच लोकप्रिय झाले.

DMart Strategy

आज देशातील ११ राज्यांमध्ये ३०० हून अधिक डीमार्ट आहेत.

DMart Strategy

राधाकृष्ण दमाणी यांनी डीमार्टसाठी काही नियम निश्चित केले. कंपनी आपल्या ब्रँड वस्तूंचा अधिक प्रचार करते.

DMart Strategy

डीमार्ट आपला स्टॉक लवकर क्लिअर करण्यावर भर देते

DMart Strategy

डीमार्ट कंपनीचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर ३० दिवसांचा असला तरी बहुतांश कंपन्यांसाठी तो ७० दिवसांचा आहे.

DMart Strategy

या कारणांमुळे, इतर दुकाने आणि इतर किरकोळ दुकानांच्या तुलनेत डीमार्टमधील वस्तू ६ ते ८ टक्क्यांनी स्वस्त आहेत.

DMart Strategy

डीमार्मध्ये त्यांच्या स्वतःच्या ब्रँडची उत्पादनंही मिळतात. या उत्पादनांच्या किमती इतर ब्रँड्सच्या तुलनेने कमी असतात.

DMart Strategy

डीमार्ट

तसेच डीमार्ट स्लॉटिंग फी देखील आकारते. जेव्हा एखाद्या कंपनीला त्यांचे उत्पादन डीमार्टमध्ये विकायचे असते, तेव्हा त्यांना स्लॉटिंग फी भरावी लागते. यातून डीमार्टला पैसे मिळतात.

DMart Strategy

ब्रँड

तसेच डी मार्टने अनेक ब्रँडशी करार केला यामुळे काही वस्तूंच्या किंमती इतर ब्रँड्सच्या तुलनेने कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Strategy