कोल्ड ड्रिंकच्या एका कॅनमध्ये किती साखर असते?

Sudesh

कोल्ड ड्रिंक

आजकाल कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक पिणे ही सामान्य बाब झाली आहे. बाहेर पार्टी असो किंवा घरात एखादा कार्यक्रम, कोल्ड ड्रिंकची बॉटल आणलीच जाते.

Cold Drink Can Sugar | eSakal

साखर

मात्र, कोल्ड ड्रिंकमध्ये असणाऱ्या साखरेच्या प्रमाणामुळे याचं वारंवार सेवन करणं अतिशय धोकादायक ठरतं.

Cold Drink Can Sugar | eSakal

धोका

शीतपेयांचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे किडनी, लिव्हर आणि त्वचेवर परिणा होतो. सोबतच यामुळे वजन वाढण्याचा धोकाही असतो.

Cold Drink Can Sugar | eSakal

प्रमाण

व्हेरी वेल फिट या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कोकाकोलाच्या एका कॅनमध्ये साधारणपणे 10 चमचे (सुमारे 39 ग्रॅम) साखर असते.

Cold Drink Can Sugar | eSakal

ऑरेंज सोडा

ऑरेंज सोडाबाबत बोलायचं झाल्यास, त्याच्या एका कॅनमध्ये सुमारे 12 चमचे साखर असते. तर, पॅकेज्ड अ‍ॅपल ज्यूसमध्ये देखील सुमारे 10 चमचे साखर असते

Cold Drink Can Sugar | eSakal

फ्रुक्टोज

कोल्ड ड्रिंकमध्ये असलेल्या साखरेत फ्रुक्टोजचे प्रमाण भरपूर असते. ही साखर लिव्हरमध्ये जमा होत जाते, आणि पुढे गंभीर समस्यांचे कारण ठरते.

Cold Drink Can Sugar | eSakal

बळी

जंक फूड आणि शर्करायुक्त सॉफ्ट ड्रिंकच्या सेवनामुळे जगभरात गेल्या वर्षात सुमारे 80 लाख लोकांचा बळी गेल्याची माहिती WHO ने दिली आहे.

Cold Drink Can Sugar | eSakal

झीरो शुगर

कोल्ड ड्रिंकमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी, त्याचं सेवन कमी करणे किंवा 'झीरो शुगर' असणाऱ्या कोल्ड ड्रिंकचे (प्रमाणात) सेवन करणे हे पर्याय वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Drink Can Sugar | eSakal