वैष्णवी कारंजकर
मुंबईतलं ताज हॉटेल हे भारतातल्या प्रत्येक सामान्य माणसासाठी कुतुहलाचा विषय आहे.
या हॉटेलमध्ये जाणं आपल्यापैकी अनेक जणांचं स्वप्न असणार हे नक्कीच.
ते कधी पूर्ण होईल माहित नाही, पण ताज हॉटेल आतून कसं दिसतं ते मात्र तुम्हाला पाहायला मिळू शकतं.
तसंच एका रात्रीसाठी या हॉटेलचं शुल्कही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ताज हॉटेलमध्ये साधारण एका रात्रीसाठीचे शुल्क साधारण 20 हजार रुपयांपासून पुढे आहे.
काही रुम्स एक लाखांहून अधिक किमतीच्याही आहेत. रुमच्या प्रकारावर त्याचं शुल्क आधारित आहे.
लक्झरी ग्रँड, राजपूत, ताज क्लब, मराठा, असे रुम्सचे विविध प्रकार या रुम्सचे आहेत. त्यानुसार त्यांची रचना आणि किंमतही बदलते.
ज्या रुम्सच्या खिडकीमधून समुद्र दिसतो, त्यांची किंमत अधिक आहे. तर शहर दिसणाऱ्या रुमची किंमत तुलनेने कमी आहे.
शिवाय स्विमिंगपूल शेजारी आऊटडोअर डायनिंगही उपलब्ध आहे.
ताज हॉटेलची लॉबी अत्यंत सुंदर पद्धतीने सजवलं आहे. मोठमोठी तोरणं, काचेची झुंबरं अधिक आकर्षक आहेत.
या हॉटेलमध्ये ५६० रुम्स असून ४४ सूट्स आहेत.
हे हॉटेल मुंबईतल्या कोलाबा भागामध्ये आहे.
गेट वे ऑफ इंडियाच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल अनेक पर्यटकांच्या कुतुहलाचा विषय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.