Aishwarya Musale
हल्ली फोन हॅक होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे अशात फोनमध्ये असलेला डेटा, फोटो, व्हिडीओ याशिवाय आर्थिक व्यव्हार असुरक्षित झाले आहेत.
त्यामुळे फोन हॅक झाला तर त्वरीत ओळखून योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. पण फोन हॅक झाला, हे कसं ओळखायचं? चला तर जाणून घेऊया.
जर तुमचा फोन हॅक झाला तर तुम्ही सहजरित्या जाणून घेऊन शकता. ही हॅकींगची टेस्ट नाही तर लक्षण म्हणता येणार. मालवेअर किंवा फ्रॉड अॅप असेल तर तुमच्या मोबाईलची बॅटरी खूप स्पीडने कमी होणार.
कारण असे अॅप्स स्क्रीन बंद झाल्यावरही काम करतात आणि तुमचा डेटा चोरतात. ज्यामुळे तुमची बॅटरी सहज लवकर लो होते.
जर तुमचा फोन कालपर्यंत ठिक होता पण आज अचानक स्लो काम करायला लागला तर हे सुद्धा फोन हॅक होण्याचं लक्षण आहे.
जर तुम्हाला वारंवार सोशल मीडियावरील अकांउटवर लॉग इनचे मेसेज येत असेल तर फोन हॅक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन अकाउंट्सला वारंवार चेक करा.
जर तुम्हाला वारंवार अनोळखी नंबर वरुन कॉल किंवा मेसेज येत असेल तर तुम्ही अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अनेकदा हॅकर्स तुमचा फोन कॉल किंवा मेसेजद्वारे हॅक करू शकतो.
एवढंच काय तर तुमचा फोन हॅक करुन हे हॅकर्स तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या मोबाईलमधीलसुद्धा डेटा चोरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.