तिरंगा खराब झाल्यावर कसा Dispose करावा?

अंकिता खाणे (Ankita Khane)

स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या 'हर घर तिरंगा' मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

Independence Day | Esakal

तिरंगा ध्वज फडकवणे ही केवळ आपली जबाबदारी नाही, तर त्याचा आदर करणे हे आपले संविधानिक कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा.

Independence Day | Esakal

प्रत्येक जण हौसेने तिरंगा खरेदी करतो पण, त्याची काळजी घेत नाहीत. आपल्याला रस्त्यावर कुठेही तिरंगा पडलेला दिसतो. प्रत्यक्षात असे करणे म्हणजे तिरंग्याचा अपमान आहे, जो दंडनीय अपराधाच्या श्रेणीत येतो.

Independence Day | Esakal

असे करताना आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि दंड भरावा लागू शकतो. तर विल्हेवाटीच्या पद्धती लक्षात ठेवा.

Independence Day | Esakal

तिरंग्याची विल्हेवाट लावण्याचे दोन मार्ग

भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार, जेव्हा राष्ट्रध्वज खराब होतो तेव्हा त्याची दोन प्रकारे विल्हेवाट लावली जाऊ शकते. यामध्ये गुप्तपणे ध्वज दफन करणे आणि जाळणे यांचा समावेश आहे.

Independence Day | Esakal

दफन करून तिरंग्याची विल्हेवाट कशी लावायची

ध्वज दफन करण्यासाठी, खराब झालेले ध्वज लाकडी पेटीत गोळा करा. घडी करून बॉक्समध्ये ठेवा. ही पेटी जमिनीत गाडून टाका. यानंतर काही काळ मौन बाळगण्याचाही नियम आहे. ध्वज पेटीत न ठेवता थेट जमिनीत गाडणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

Independence Day | Esakal

​विल्हेवाट लावण्यासाठी तिरंगा जाळण्याचा नियम

ध्वज जाळण्यासाठी जागा स्वच्छ करा. तिरंगा व्यवस्थित दुमडून घ्या. काळजीपूर्वक आणि आदराने आगीच्या मध्यभागी ठेवा. लक्षात ठेवा की झेंडा दुमडल्याशिवाय किंवा शेवटपासून जाळणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day | Esakal