Ghee: घरच्या घरी साजूक तूप कसे बनवायचे?

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संस्कृतीमध्ये साजूक तुपाला खूप महत्त्व आहे.

साजूक तुपामुळे साध्या वरण-भातालाही पूर्णत्व प्राप्त होते.

लोणी स्निग्ध गुणात्मक असल्याने तूपसुद्धा स्निग्ध गुणात्मक आहे.

लोण्यापासून तूप तयार करताना लोणी प्रथमत: गरम केले जाते.

हळूहळू लोण्यातील पाण्याचा अंश कमी होऊ लागतो आणि फेसाळपणा ओसरू लागतो व तापमानात शीघ्र वाढ होऊ लागते.

वाढत्या तापमानामुळे लोण्यातील घन पदार्थ सोनेरी रंगात बदलून तळाशी एकत्रित होतात. 

अधिकाधिक तापमान दिल्यास तळाशी असलेले घन पदार्थ तपकिरी रंगात बदलतात.

द्रवातून विशिष्ट सुगंध येऊ लागतोहा बदल घडल्यास तूप तयार झाले असे समजावे व आता तापमान देणे बंद करण्यास हरकत नसते.

तयार झालेले तूप गाळून घेतल्यास ते पाणी व दुधातील घन पदार्थरहित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.