चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी ही सोपी ट्रिक वापरा, चेहरा दिसेल उजळ

साक्षी राऊत

काही लोकांच्या चेहऱ्यावर फार केस असतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य गेल्यासारखे त्यांना वाटते. तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्याचे हे सोपे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

Face Hair

पपई

पपई मॅश करून त्यात मध आणि दूध टाकून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. पेस्ट थोडी सुकल्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावरून चोळून काढा. तुमच्या चेहऱ्यावरचे केस कमी होतील.

Face Hair

लिंबू-साखर

साखर, लिंबू आणि पामी मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि हलक्या हातांनी स्क्रब करा. असे केल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन आणि केसांपासून सुटका मिळते.

Face Hair

तांदळाचे पीठ

तांदळाच्या पीठात गुलाब जल मिक्स करून चेहऱ्याला लावा. त्यानंतर हलक्या हातांनी स्क्रब केल्यानंतर तुम्हाला नको असलेल्या केसांपासून सुटका मिळेल.

Face Hair

बेसन दही

बेसन, एक चिमुट हळद आणि दही लावून चेहऱ्यावर काही वेळ ठेवा. पेस्ट सुखल्यानंतर हलक्या हातांनी स्क्रब करा, केसांची समस्या कमी होईल.

Face Hair

दूध-हळद

१ चमचा दूधात एक-दोन हळद मिसळून चेहऱ्याला लावा. पेस्ट सुखल्यानंतर हलक्या हातांनी स्क्रब करा. चेहऱ्यावरील केस निघतील.

Face Hair

ओटमील

ओटमील केळीत चांगल्याप्रकारे मॅश करून चेहऱ्यावर लावा. काही वेळ लावून ठेवल्यानंतर हातांनी स्क्रब करत काढून घ्या. त्यामुळे चेहऱ्यावरील मळ आणि नको असलेले केस काढून टाकता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Hair