पावसाळ्यात वाढतो फंगल इन्फेक्शनचा धोका, अशी घ्या पायांची काळजी Skin Care

Aishwarya Musale

पावसाळा

पावसाळा हा अनेक आजार घेऊन येतो. रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे बराच त्रास होऊ शकतो. पावसाच्या पाण्यामुळे कधीकधी संसर्ग होतो.

monsoon | sakal

पायांना त्रास

विशेषत: पायांना जास्त त्रास होऊ शकतो. खाज सुटणे, जखम होणे, पायाच्या बोटांच्या दरम्यान इन्फेक्शन होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

monsoon | sakal

फंगल इन्फेक्शन

पायाला फंगल इन्फेक्शन झाले असेल तर काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.

monsoon | sakal

मीठाच्या पाण्यात पाय बुडवावेत

घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवा. एका टबमध्ये सोसवेल इतके गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे मीठ घालावे. नंतर त्यात पाय बुडवून बसावे. अर्ध्या तासासाठी पाया मीठाच्या पाण्यातच ठेवावे.

monsoon | sakal

अँटी-बॅक्टेरिअल

नंतर बाहेर काढून नीट कोरडे करावे. बोटांच्या मधील जागाही नीट टिपून कोरडी करावी. मीठ हे अँटी-बॅक्टेरिअल असते

monsoon | sakal

कडुनिंबाच्या पानांचा लेप

कडुनिंबाची पेस्ट बनवा. पायाला जिथे संसर्ग झाला असेल तिथे ही पेस्ट लावू थोडा वेळ राहू द्या. ती वाळल्यानंतर काढून टारा आणि पाय स्वच्छ धुवून कोरडा करावा.

monsoon | sakal

ॲपल सायडर व्हिनेगर

याचा वापर करण्यासाठी थोड्याशा पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिसळला आणि ते मिश्रण इन्फेक्शन झालेल्या भागावर लावा.

monsoon | sakal

इन्फेक्शन

हे जमत नसेल तर एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिसळा व त्यात पाय बुडवून बसा. यामुळे पायाचे इन्फेक्शन तसेच खाज कमी होण्यास मदत होऊ शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

monsoon | sakal