'बंटी तेरा साबण स्लो है' या जाहीरातीतील मुलगी आठवतेय?

सकाळ डिजिटल टीम

लाईफ बॉयच्या जाहीरातीत दिसणाऱ्या त्या मुलीचं नावं अवनीत कौर आहे.

अवनीत कौर आता सोशल नेटवर्किंगवर लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. अभिनेत्री, मॉडल आणि डान्सर म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली असून इन्स्टाग्रामवर 2 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.

वयाच्या 19 व्या वर्षी अवनीतला ‘मोस्ट स्टायलिस्ट इन्फ्यूएन्सर’ हा पुरस्कारही मिळालाय.

सब टीव्हीवरील अलादीन या मालिकेत अवनीत कौरने प्रिन्सेस यास्मिनीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली.

डान्स इंडिया डान्स, डान्स के सुपरस्टार्स, झलक दिखला जा, या सारख्या कार्याक्रमांमध्येही ती सहभागी झाली होती. ‘मेरी माँ’, ‘सावित्री’, ‘एक मुठ्ठी आसमान’, ‘हमारी सिस्टर दीदी’, ‘ट्विस्टवाला लव्ह’ सारख्या मालिकांमध्ये अवनीतने काम केलं आहे. 

अवनीतने आपल्या करीअरबरोबच आपलं शिक्षणही सुरु ठेवलं आहे. मुंबईच्या एका खाजगी कॉलेजमधून अवनीत कॉमर्सची पदवी घेतेय.

अवनीत कौरकडे 80 लाख रुपयांची रेंजरोवर आहे. याशिवाय ह्युंडई, क्रेटा, स्कोडा, फॉर्च्यूनर अशा लक्झरी गाड्याही आहेत.

सोशल मीडिया आणि ब्रँड अॅम्बेसडन, प्रमोशनल पोस्ट या माध्यमातून ती दरमहिन्याला जवळपास 8 ते 10 लाख रुपये कमवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.