माहिती महाराष्ट्रातील गडकिल्यांची

रफिक पठाण

शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती पावन जागा म्हणजे शिवनेरी. हा किल्ला त्रिकोणी आकारात बांधण्यात आलेला असून यामध्ये अनेक शिवकालीन वास्तू आणि तळे आहेत.

Shivneri

पुण्यात असलेला सिंहगड किल्ला हा प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी मुघलांच्या ताब्यातून सोडवत सर केला होता.

Sinhgad

हा किल्ला सह्याद्रीतील मुरूंबदेवी डोंगर माथ्यावर बांधण्यात आला. हा किल्ला शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होय. महाराजांच्या पत्नी सईबाई यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ इथे व्यतित केला होता

Rajgad

प्रतापगड हा शिवाजी महाराजांनी बांधलेला महत्त्वपूर्ण किल्ला आहे. प्रतापगड किल्ला हा ओळखला जातो तो यावर झालेल्या युद्धासाठी जे शिवाजी महाराज आणि अफझल खानात झालं होतं.

कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी सर्वात गाजलेली लढाई म्हणजे पावनखिंडीची. खरंतर हा किल्ला कोल्हापूरच्या राणी ताराबाई यांचं घर असं म्हटलं जातं.

panhala

महाराष्ट्रातील किल्ले अनेक असले तरी तोरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.तोरणा किल्ला हा प्रचंड गड म्हणूनही ओळखला जातो. हा पुणेस्थित किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो.

Torna

हा किल्ला मुंबईपासून अवघ्या 55 किलोमीटरवर आहे. या किल्ल्यावर पोचण्यासाठी कोणताही डोंगर किंवा टेकडी चढण्याची गरज नाही.किल्ल्याचं बाहेरून काही नुकसान झालं नसलं तरी आतमध्ये बरीच पडझड झाली आहे.

Vasai

सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग हा सर्वात जुना किल्ला . हा मराठा राजवटीतील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. इथे सैन्याची सर्व जहाजांचे नांगर टाकण्यासाठीचं महत्त्वपूर्ण बंदर होतं. या किल्ल्याला इस्टर्न गिब्राल्टर असं बिरूदही देण्यात आलं होतं.

Vijaydurg

मालवणच्या किनाऱ्यावर असलेला सिंधुदुर्ग किल्ला. हा किल्ला तब्बल 43 एकरवर पसरलेला आहे. हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. या किल्ल्याला भव्य संरक्षक भिंत आहे.

Sindhudurg

समुद्राच्या मधोमध बांधण्यात आलेला हा किल्ला वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे. या किल्ल्याला तब्बल 26 बुरूज असून काही दरवाजे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

murud- janjira