नवरात्रीच्या उपवासाला ९ दिवस खा 'हे' हेल्दी पदार्थ

साक्षी राऊत

कुट्टू डोसा

नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोज तूप आणि तेलाचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तेव्हा तुम्ही कुट्टूचा डोसा बनवू शकता. कुट्टूच्या पिठाचा डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसह खाऊ शकता.

Navratri Fasting Food

शाबुदाणा खिचडी

एनर्जी बूस्टिंग स्टार्चयुक्त शाबुदाण्यात तुम्ही शेंगदाण्याऐवजी काजू आणि बटाट्याचा वापर करा. कमीत कमी तेलात तुम्ही ही खिचडी बनवू शकता.

Navratri Fasting Food

केळीची स्मूदी

केळी एनर्जी देते. उपवासाच्या काळात दिवसाची सुरुवात एनर्जेटिक व्हावी यासाठी केळी, दही आणि अक्रोड मिसळून स्मूदी बनवावी.

Navratri Fasting Food

शाबुदाण्याचे अप्पे

कमी तेलात तुम्ही शाबुदाण्याचे अप्पे अगदी आरामात बनवू शकता.

Navratri Fasting Food

दुधी भोपळ्याची भाजी

उपवासात दुधी भोपळ्याची भाजी पोटाासाठी थंड असते. या भाजीने भूक जास्त लागत नाही आणि पोट दीर्घकाळ भरलेले असल्याचे जाणवते.

Navratri Fasting Food

बदाम लाडू

बदाम लाडू बनवण्यासाठी बदाम मिक्सरमधून बारीक करून त्यात साखर मिसळून त्याचे लाडू बनवा.

Navratri Fasting Food

मखाणा खीर

कॅल्शियमयुक्त मखाण्याची खीर उपवासासाठी एक आयडियल स्वीट डिश आहे. यात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात.

Navratri Fasting Food

नारळ पाणी

इलेक्ट्रोलाइट्सयुक्त नारळ पाणी तुमच्या शरीराला दीर्घकाळ हायड्रेट ठेवण्यास मदत करते. ९ दिवसांत रोज एक ग्लास नारळ पाणी प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navratri Fasting Food