Sudesh
दरवर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यांवर 21 तोफांची सलामी दिली जाते. यासाठी गेल्या वर्षीपासून ब्रिटिश तोफांऐवजी स्वदेशी तोफा वापरण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती.
यासाठी यावर्षी 105 mm इंडियन फील्ड गन या तोफांचा वापर करण्यात आला. वजनाला हलक्या असणाऱ्या या तोफांची वेगळीच खासियत आहे.
या तोफांची निर्मिती 1972 साली सुरू करण्यात आली. डीआरडीओच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाने ही तोफ तयार केली आहे.
1984 साली जबलपूरमधील गन फॅक्ट्रीमध्ये याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं. यासोबतच कानपूरच्या फील्ड गन फॅक्ट्रीमध्येही याची निर्मिती सुरू झाली होती.
इंडियन फील्ड गनचे तीन मॉडेल उपलब्ध आहेत. यामध्ये MK-1, MK-2 आणि ट्रक माउंटेड अशा व्हेरियंटचा समावेश आहे. यातील सगळ्यात कमी वजनाचं मॉडेल 2,380 किलोचं; तर सगळ्यात जड मॉडेल हे 3,450 किलोचं आहे.
वजनाला हलकी असलेली ही तोफ तीन तुकड्यांमध्ये तोडून, पुन्हा असेंबल करता येते. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने ही तोफ कुठेही नेता येते.
19,6 फूट लांब असणाऱ्या या तोफेची नळीच 7.7 फूट लांब असते. यामध्ये 105x371 mm R गोळा वापरण्यात येतो. याची रेंज 17 ते 20 मीटर एवढी आहे.
एका मिनिटाला या तोफेतून सहा गोळे डागता येतात. विशेष म्हणजे -27 ते 60 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही ही तोफ काम करू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.