भारताकडून 100 कसोटी खेळणारे 10 खेळाडू; तीन मराठी खेळाडूंचा समावेश

अनिरुद्ध संकपाळ

भारताकडून आतापर्यंत जवळपास 10 खेळाडूंनी 100 कसोटी खेळण्याचा मान मिळवला आहे.

सचिन तेंडुलकर

भारताकडून सर्वात जास्त कसोटी खेळण्याचा मान हा सचिन तेंडुलकरला मिळाला आहे. त्याने 200 कसोटी खेळल्या आहेत.

राहुल द्रविड

भारताकडून शंभर पेक्षा जास्त कसोटी खेळण्यामध्ये सचिन पाठोपाठ राहुल द्रविडचा नंबर लागतो. त्याने भारताकडून 163 कसोटी सामने खेळले आहेत.

व्हीव्हीएस लक्ष्मण

व्हीव्हीएस लक्ष्मणने भारताकडून 134 कसोटी सामने खेळले आहेत.

अनिल कुंबळे

भारताचा फिरकीपटू आणि माजी कर्णधार अनिल कुंबळेने भारताकडून 132 कसोटी सामने खेळले आहेत.

कपिल देव

भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताकडून 131 कसोटी सामने खेळले आहेत.

सुनिल गावसकर

भारताचे दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी भारताकडून 125 कसोटी सामने खेळले आहेत.

दिलीप वेंगसरकर

दिलीप वेंगसरकर यांनी देखील भारताकडून शंभरपेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 116 कसोटी सामने खेळले आहेत.

सौरव गांगुली

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सैरव गांगुलीने 113 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे.

विराट कोहली

विराट कोहलीने देखील भारताकडून शंभर पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत 111 कसोटी सामने खेळले आहेत.

इशांत शर्मा

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 105 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.