सकाळ डिजिटल टीम
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट स्त्री सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉरर चित्रपट म्हणून ओळखला जातो, या चित्रपटाने 181 कोटींची कमाई केली आहे.
'राझ3' या हॉरर चित्रपटाची कमाई 100 कोटी झाली असून या चित्रपटात प्रमुख भूमिकेत बिपाशा बसू, इमरान हाश्मी आणि ईशा गुप्ता आहेत
अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा 'भूल भुलैया' हॉरर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 82 कोटींची कमाई केली होती.
साऊथ अभिनेत्री ज्योतिकाचा चंद्रमुखी चित्रपट देखील सर्वात जास्त कमाई करणारा हॉरर चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने 80 कोटींची कमाई केली होती.
सनी लिओनचा हॉरर चित्रपट रागिनी एमएमएस 2 ने बॉक्स ऑफिसवर 64 कोटी कमावले, हा चित्रपट भारतातील सर्वात भयानक चित्रपटांपैकी एक आहे.
भूत – भाग एक: द हॉन्टेड शिप हा भानु प्रताप सिंग यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिस अंदाजे 40.94 कोटी कमाई केली.
हार्दिक मेहता दिग्दर्शित रुही हॉरर चित्रपटात राजकुमार राव ,जान्हवी कपूर आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटने अंदाजे 30.33 कोटींची कमाई केली होती.
राही अनिल बर्वे दिग्दर्शित तुंबड हा हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 13.57 कोटींची कमाई केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.