ही फक्त मैत्री नाही तर यामागे आहे बिझनेसचा खेळ! संपूर्ण गणित समजून घ्या

Sandip Kapde

COP28 शिखर परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबई येथे COP28 शिखर परिषदेसाठी गेले होते. हवामान बदलासंदर्भात जगभरातील नेते तेथे जमले होते.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

दुबईत पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

मेलोनी

मेलोनी आणि नरेंद्र मोदी या दोघांनीही या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची खूप चर्चा होत आहे.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

राजनैतिक संबंध

मात्र चर्चेचे कारण केवळ दोघांचा फोटो नसून इटली आणि भारत यांच्यातील वाढते सहकार्य हे आहे. व्यापार असो वा राजनैतिक संबंध, भारत आणि इटली वेगाने एकत्र पुढे जात आहेत.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

आर्थिक भागीदारी

भारत आणि इटली यांच्यातील आर्थिक भागीदारी आजकाल सर्वोच्च पातळीवर आहे. 2021-22 या वर्षात भारत-इटली व्यापार 13.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1 लाख कोटी इतका वाढला आहे.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

हवामान बदलाविरुद्ध लढा

आता जगाला वाचवण्यासाठी भारत आणि इटली हवामान बदलाविरुद्ध लढा देतील. त्याची रणनीती COP28 शिखर परिषदेत तयार करण्यात आली आहे.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले, ते म्हणाले, "COP28 शिखर परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली"

Narendra Modi-and-Giorgia Meloni

"समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठी भारत आणि इटलीच्या संयुक्त प्रयत्नांवर मला विश्वास आहे", असे मोदी म्हणाले.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

कार्बन उत्सर्जनावर भारताचा ठराव

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ग्लोबल साउथ देशांमधील सहकार्याच्या महत्त्वाबद्दलही बोलले.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

COP-28 मध्ये पंतप्रधान मोदींनी हवामान बदलावर चिंता व्यक्त केली आणि जागतिक स्तरावर एकत्र काम करण्यावर भर दिला.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

COP33

यासोबतच पंतप्रधान मोदींनी 2030 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जन 45 टक्क्यांनी कमी करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. याशिवाय COP33 चे यजमानपद भारताकडे सोपवण्याचा प्रस्तावही पंतप्रधान मोदींनी मांडला.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

या परिषदेत मोदींनी अनेक महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांवर आपली मते मांडली. आपण जसा आपल्या हेल्थ कार्डचा विचार करतो तसाच पर्यावरणाचाही विचार करायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

हवामान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विकसित देशांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काही देशांच्या चुकीच्या कृत्यांमुळे आज संपूर्ण जग हवामान बदलाची किंमत चुकवत आहे.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

पंतप्रधान नरेंद्र मोदी

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले, विशेषत: 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 45 टक्क्यांनी कमी करणे.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

COP-28

COP-28 चा उद्देश हवामान बदल रोखण्यासाठी सर्व देशांमध्ये एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. याशिवाय 2015 मध्ये झालेल्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीवरही भर दिला जात आहे.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

ग्लोबल वॉर्मिंग

यासोबतच ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवणे हा समिटचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे.

Narendra Modi-and-Giorgia Meloni

शिखर परिषद

त्याच वेळी, 2030 पूर्वी ऊर्जा संक्रमणाला गती देणे आणि कोळसा, तेल आणि वायूचे उत्पादन कमी करणे हा या शिखर परिषदेचा मुख्य अजेंडा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi-and-Giorgia Meloni