थंडीत आवडीने खाल्ले जातात 'हे' स्ट्रीट फूड, जाणून घ्या

Aishwarya Musale

हिवाळ्याचा महिना सुरू झाला आहे आणि आता थोडी थोडी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. हिवाळा म्हटलं की चमचमीत पदार्थ खाण्याचा आनंद द्विगुणित होतो. थंडीत गरमागरम चहासोबत खुसखुशीत स्नॅक्स खाण्यात वेगळाच आनंद असतो.

फक्त चहाप्रेमीच नाही, तर अनेक खवय्ये देखील थंडीत विविध खाद्यपदार्थ खाण्याचे शौकिन असतात. या काळात अनेकजण स्ट्रीट फूडवर अधिक भर देतात. बाहेर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची चवच इतकी भारी असते की, आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.

विशेष म्हणजे काही रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद हा फक्त थंडीच्या मोसमात घेतला जातो. हिवाळ्यात काही खाद्यपदार्थ मोठ्या उत्साहाने खाल्ले जातात.

गाजरचा हलवा

जर आपण हिवाळ्यात खाल्ल्या जाणार्‍या पदार्थांबद्दल बोललो तर, गाजर हलव्याला विसरुन कसं चालेल? फक्त घरातच नाही, तर भारताच्या जवळपास प्रत्येक गल्लीत किंवा कोपऱ्यात गाजरचा हलवा विकणारे दिसतात.

पाया सूप

हिवाळ्यातील ही एक लोकप्रिय डिश आहे, जी शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते. मुंबईत मटणाचं पाया सूप सर्वाधिक प्रमाणात प्यायलं जातं, तर दिल्लीचे लोक पारंपारिक पद्धतीने शेळी, मेंढ्या किंवा इतर प्राण्यांच्या पायापासून सूप बनवतात.

पाणीपुरी

थंडीच्या मोसमात गरमागरम पाणीपुरी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. पाणीपुरी तोंडात टाकल्यावर फुटते आणि तिचा जो स्वाद असतो, तो शब्दातही सांगता येणार नाही.

छोले भटुरे

थंडीच्या दिवसांत अनेकजण छोले भटुरे खाण्याला पसंती दर्शवतात. अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्वजण हा पदार्थ आवडीने चाखतात. दिल्ली आणि छोले भटुरे यांच्यात तर एक अतुट नातं आहे.

मसाला दूध

थंडीची मजा वाढवण्यासाठी अनेकजण मसाला दूध पिण्याला पसंती दर्शवतात. थंडी वाढू लागली की मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.