'हा' प्रसिद्ध IAS अधिकारी खजूर शेतीतून मिळवतोय लाखोंचं उत्पन्न; वर्षाला कमावतोय 18 लाख

सकाळ डिजिटल टीम

IAS अधिकाऱ्याची प्रेरणादायी कहाणी

भारतीय प्रशासकीय (IAS) अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर एकतर (सेवानिवृत्तीनंतर) ते घरी विश्रांती घेतात किंवा दुसरी नोकरी करतात. परंतु, याला सिद्धार्थ सिंह अपवाद आहेत.

IAS officer Siddharth Singh

पश्चिम बंगालमध्ये 17 वर्षे सेवा

सिद्धार्थ सिंह हे 1983 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. पश्चिम बंगाल केडरमध्ये त्यांना पोस्टिंग मिळाली होती. सिद्धार्थ सिंह यांनी पश्चिम बंगाल केडरमध्ये 16-17 वर्षे सेवा केली. याशिवाय, त्यांनी युरोपियन भारतीय मिशनमध्येही काम केलं.

दिनाजपूरमध्ये भूषवलं जिल्हाधिकारी पद

सिद्धार्थ सिंह यांनी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी आणि उत्तर दिनाजपूर इथं जिल्हाधिकारी पद भूषवलं. तसेच दार्जिलिंगमध्ये मुख्य प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे.

IAS officer Siddharth Singh

वडिलोपार्जित 100 एकरहून अधिक जमीन

सिद्धार्थ सिंह 2018 मध्ये सेवानिवृत्तीनंतर रूपपुरा या आपल्या मूळ गावी परतले आणि तिथं त्यांनी खजूर पिकवायला सुरुवात केली. गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन 100 एकरहून अधिक आहे. त्यांनी स्वतः सहा एकर जमीन खरेदी केलीये. राजस्थान सरकारच्या टिश्यू कल्चर योजनेअंतर्गत 90% खजुराची 500 रोपेही त्यांनी शेतात लावली आहेत.

IAS officer Siddharth Singh

महिन्याला लाखाचा फायदा

500 झाडं आता चांगलं उत्पन्न देऊ लागली आहेत. उत्पादनाचा आकडा 45 टनांवर पोहोचला आहे. सिद्धार्थ सिंहच्या म्हणण्यानुसार, ते खजूर विकून दरवर्षी 17 ते 18 लाख रुपये कमावतात. पाच-सहा लाखांचा खर्च वगळला, तर 12 लाख रुपये म्हणजे महिन्याला एक लाख रुपये फायदा होतो.

IAS officer Siddharth Singh

नशिबानंही दिली चांगली साथ

सिद्धार्थ सिंह यांचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून रायडा, गहू आणि मूग अशी पारंपरिक शेती पिकवत आहे. त्यांनी आधुनिक शेतीची निवड केली आणि नशिबानंही त्यांना चांगली साथ दिली.

IAS officer Siddharth Singh

लोकांसाठी रोजगाराचा स्रोत

IAS सेवानिवृत्तीनंतर शेतकरी म्हणून आपली दुसरी इनिंग खेळणारा सिद्धार्थ सिंह एक यशस्वी शेतकरी तर बनलेच, पण अनेक लोकांसाठी ते रोजगाराचा स्रोतही बनले आहेत.

IAS officer Siddharth Singh

शेतकरी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात

सिद्धार्थ सिंह यांनी आपल्या शेतात सौर उर्जा प्रकल्प आणि ठिबक सिंचन यंत्रणा देखील बसवली आहे. आजूबाजूचे अनेक शेतकरी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS officer Siddharth Singh