Aishwarya Musale
सकाळी उठल्यावर हवी हवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे चहा. जवळपास ९० टक्के लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहा पिऊन करतात.
तसे, अनेक पेयांना चहाचे नाव दिले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊया चहाचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे
सीटीसी चहा म्हणजे आपण रोज पितो तो चहा.
ग्रीन टी ला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. यात अँटी-ऑक्सिडंट जास्त असतात.
ग्रीन टीमध्ये तुळस, अश्व गंधा, वेलदोडे, दालचिनी वगैरे घालून हर्बल टी किंवा चहा तयार होतो. यात एक किंवा तीन चार हर्ब एकत्र करूनही घातले जातात.
ज्या चहाच्या वनस्पतींच्या वाढीसाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, त्याला ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय चहा म्हणतात.
हा चहा सर्वात कमी प्रोसेस्ड चहा आहे. इतर चहाच्या तुलनेत पांढऱ्या चहामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. त्याचा हलका गोड स्वाद खूप छान असतो.
कोणताही चहा दूध आणि साखर न घालता प्यायले की, त्याला ब्लॅक टी असे म्हणतात. ग्रीन टी किंवा हर्बल टी हे दूध न घालताच प्यायले जाते.
लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे अँटी ऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, लिंबाचा रस घातल्याने ते मिसळले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.