Anti-Corruption Day : महाराष्ट्रातल्या 'या' नेत्यांवर होते भ्रष्टाचाराचे आरोप

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीत महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

छगन भूजबळ | सकाळ

शंभर कोटी वसूली प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनिल देशमुख | सकाळ

अनिल परब यांच्यावर परिवहन विभाग भ्रष्टाचार प्रकरणी आरोप करण्यात आले होते

अनिल परब | सकाळ

गोवावाला कंपाउंड मलिकांनी डी गँगच्या संगनमताने बळकावल्याचं आरोप करण्यात आला. मलिकांनी या जागेवर बेकायदेशीर कब्जा मिळवल्याचाही आरोप करण्यात आलाय.

नवाब मलिक | सकाळ

आदर्श घोटाळा प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

अशोकराव चव्हाण | सकाळ

पत्राचाळ जमीन घोटाळा एक हजार ३४ कोटी रुपयांचा होता. यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय राऊतांनावर करण्यात आला होता.

संजय राऊत | सकाळ

1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला.या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते.

अजित पवार | सकाळ

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री असताना पंकजा मुंडे यांच्या खात्याने एकाच दिवसात २४ आदेश काढून २०६ कोटींची चिक्की, डिशेस, चटई आणि पुस्तकं खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यालाच चिक्की घोटाळा म्हणतात.

पंकजा मुंडे | सकाळ

2500 कोटींचा तूर घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांचंही नाव समोर आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धनंजय मुंडे | सकाळ