'हे' आहेत जगातील सर्वात उंच पर्वत, जाणून घ्या

Aishwarya Musale

आज 11 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशाची भौगोलिक रचना बघता भारतात हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरावली अशा अनेक जुन्या-नव्या पर्वत रांगा आहेत.

जगातलं सगळ्यात उंच ठिकाण कुठलं असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्ही हिमालय म्हणालं; पण जगातलं सगळ्यात उंच पर्वत भारताच्या आसपासच आहेत.

अनेकदा आपण हे विसरतो की, भारत हा भौगोलिक दृष्ट्या जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात भिन्न प्रदेश आहे. चला तर, मग जाणून घेऊया जगातील उंच पर्वतांबाबत..

माऊंट एव्हरेस्ट 

 नेपाळ आणि चीनच्या सीमेवर असणाऱ्या या सर्वोच्च पर्वतशिखराची नवी उंची पूर्वीपेक्षा 86 सेंटीमीटर्स जास्त आहे. पूर्वीच्या मोजदादीनुसार ही उंची 8,848 मीटर होती. या उंचीमध्ये शिखरावरचं बर्फाच्छादित टोकही (Snow Cap) मोजण्यात आलंय.

कंचनजंघा 2

कंचनजंघा 2 हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच पर्वत आहे. के 2 या नावानं ओळखले जाणारं हे पर्वत 8,611 मीटर उंच आहे. याची व्याप्तीही खूपच मोठी आहे.

कंचनजंघा

हे जगातील माऊंट एव्हरेस्ट व के 2 यांच्यानंतरचं तिसरं सर्वात उंच शिखर आहे. भारताच्या सिक्कीम राज्यात असून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची 8,586 मीटर (28,169फूट) इतकी आहे.

ल्होत्से

ल्होत्से (नेपाळी) हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माऊंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 8,516 मीटर (27,940 फूट) आहे.

मकालू

माउंट एव्हरेस्टपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. मकालू हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची 8463 मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.