International Tiger Day 2023: वाघाला प्रत्यक्ष पाहायचंय? या 10 ठिकाणांना द्या भेट

सकाळ डिजिटल टीम

नागरहोल / काबिनी

दक्षिण भारतात असलेल्या नागरहोल व्याघ्र प्रकल्पात वाघांचे सर्वाधिक प्रमाण आहे. वाघांसह अन्य प्राणी-पक्षी पाहण्यासाठी जंगल सफरकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे.

International Tiger Day | sakal

पेंच

पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे.  मध्य प्रदेशातील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यात हे उद्यान आहे. तीन व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणजे पेंच. येथे दिवसा तसंच रात्रीच्या वेळेस जंगलसफारी करून वाघाचे दर्शन घेतले जाऊ शकते.   

International Tiger Day | sakal

काझीरंगा

काझीरंगा हे दुर्मिळ अशा एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे, पण येथे व्याघ्र प्रकल्पही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येथील वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 

International Tiger Day | sakal

कॉर्बेट 

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात जुने पार्क आहे. येथे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक उपाययोजना आखल्या जातात.  

International Tiger Day | sakal

सातपुडा

सातपुडा व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पास नक्की भेट द्या.

International Tiger Day | sakal

पिलीभीत 

वाघांचे दर्शन घेण्यासाठी आपण उत्तर प्रदेशातील पीलीभीत व्याघ्र प्रकल्पास भेट देऊ शकता. 

International Tiger Day | sakal

ताडोबा- अंधारी

महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र दर्शनाकरिता प्रसिद्ध आहे. येथील स्थानिक वाघाची देव म्हणून पूजा करतात. 

International Tiger Day | sakal

बांधवगड राष्ट्रीय उद्यान

बांधवगड राष्ट्रीय उद्यानात रॉयल बंगाल टायगर्सची संख्या सर्वाधिक आहे. येथे पांढऱ्या वाघांचंही दर्शन घडतं असे म्हटलं जाते.  

International Tiger Day | sakal

रणथंबोर नॅशनल पार्क 

वाघांची सर्वाधिक संख्या असणारे उद्यान म्हणून रणथंबोर राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. या उद्यानास नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत असतात.

International Tiger Day | sakal

कान्हा नॅशनल पार्क 

मध्य प्रदेशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ‘कान्हा’ येथे ‘लँड ऑफ द टायगर’ या फिल्मचेही चित्रिकरण करण्यात आले होते. या पार्कलाही आपण भेट देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

International Tiger Day | sakal