IPL 2023 : 'डॉट'चे बादशाह; भारताचे बाप गोलंदाज!

अनिरुद्ध संकपाळ

मोहम्मद सिराज

आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज पॉवर प्लेमध्ये हमकास यश मिळवून देतो. तो पर्पल कॅपच्या रेसमध्ये देखील आहे. त्याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 89 निर्धाव चेंडू टाकले आहेत.

मोहम्मद शमी

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीचा कणा असलेल्या मोहम्मद शमीने आतापर्यंत 27 षटकात 88 चेंडू निर्धाव टाकले आहेत.

भुवनेश्वर कुमार

सनराईजर्स हैदराबादची यंदाच्या हंगामात फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. मात्र त्यांचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 23 षटकात 67 चेंडू निर्धाव टाकत कमाल केली.

ट्रेंट बोल्ट

राजस्थान रॉयल्सचा ट्रेंट बोल्ट यंदाच्या हंगामात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा दमदार गोलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत 66 चेंडू निर्धाव टाकले आहेत.

अर्शदीप सिंग

पंजाब किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून तो डेथ ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी करत आहे. त्याने 7 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. तर 65 चेंडू निर्धाव देखील टाकले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.