IPL 2023 Auction : या 5 खेळाडूंवर बसेल 'अनसोल्ड'चा शिक्का?

अनिरुद्ध संकपाळ

अजिंक्य रहाणे

भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे या लिलावात अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे. गेल्या तीन हंगामात त्याने 18 सामन्यात मिळून 254 धावाच केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट देखील 104 इतकाच आहे. गेल्या हंगामात त्याला बेस प्राईसला खरेदी करण्यात आले होते.

केन विलयम्सन

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन गेल्या हंगामात सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार होता. मात्र त्याची टी 20 क्रिकेट प्रकारात फारशी चांगली कामगिरी होत नाहीये. 2022 च्या हंगामात त्याने 93 च्या स्ट्राईक रेटने 216 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून देखील टी 20 मध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय झालेली नाही.

मोहम्मद नबी

अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी हा टी 20 क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने 17 सामन्यात 13 विकेट आणि 180 धावा केल्या आहेत. केकेआर संघात असलेल्या नबीला गेल्या हंगामात एकाही सामन्यात संधी देण्यात आली नव्हती.

डेव्हिड मलान

डेव्हिड मलान हे आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 14 अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. वनडेतही त्याचे रेकॉर्ड दमदार आहे. मात्र असे असले तरी त्याला आयपीएलमध्ये एखादा खरेदीदार मिळेल असे वाटत नाही.

जेसन रॉय

इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉय गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. त्याला इंग्लंड टी 20 संघातून देखील बाहेर करण्यात आले आहे. इंग्लंडच्या टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा देखील तो नव्हता. त्यामुळे तो आयपीएलच्या 2023 च्या लिलावात देखील अनसोल्ड राहण्याची दाट शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.